अर्थसखी
सारांश: ज्ञानप्रबोधिनी ही संस्था सामाजिक स्तरावर महत्वपूर्ण काम करते आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. याच संस्थेच्या माध्यमातून पंचवीस तीस वर्षांपूर्वी पुण्याच्या वेल्हे भागात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची एक चळवळ उभी राहिली. त्यातील महत्वपूर्ण शिलेदार म्हणजे सुवर्णा गोखले. ज्ञानप्रबोधिनीत शिकलेल्या, शहरी वातावरणात वाढलेल्या, सुरुवातीला ग्रामीण प्रश्नांचे गंधही नसलेल्या सुवर्णाताईंचा प्रवास थक्क करणारा आहे. हा प्रवास इतका उद्बोधक आहे की, त्या प्रवासाचे कथन करायला त्यांना आज रिझर्व बँक, अनेक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बोलावले जाते. अर्थसखी या पुस्तकात मांडलेली ग्रामीण महिला व त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची वाटचाल कोणत्याही स्त्रीस किंवा पुरुषास प्रेरित करणारी आहे. लेखक: सुवर्णा गोखले संदर्भ क्रमांक: ६०२३