हळद उत्पादन व व्यापार
सारांश: हळदीची लागवड बहुउद्देशीय आणि आर्थिकदृष्ट्या अनमोल असल्याने, तिच्या यशस्वीतेसाठी, आधुनिक तंत्रज्ञान, शिफारशींची अंमलबजावणी, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतातील अनुभवांचा अभ्यास, आमच्या प्रायोगिक चाचण्यांचा आणि इतर संशोधन केंद्रातील निष्कर्षांचा तसेच प्रक्रियाकृत पदार्थ निर्मिती करणाऱ्या उद्योगसमूहांचा आणि ठिकठिकाणच्या बाजारपेठा, निलाव, हळदीचे पेवे व कष्टकरी हळद पिकविणाऱ्यांच्या समस्यांचा मी बारकाईने अभ्यास करुन ही 'हळदीची संदर्भगाथा' एकूण २० प्रकरणांमध्ये सविस्तरपणे लिहली आहे. हळदीविषयी तसे एवढे विस्तृतपणे मराठी आणि तेही सोप्या भाषेतून यापूर्वी कोणीही लिहले नसल्याने ह्या विषयाची उणीव सदरहू पुस्तकाचे रुपाने भरुन निघणारी आहे. कारण यामध्ये प्रत्येक प्रकरण हे अभ्यासपूर्वक नि सखोलपणे विशद केलेले असून त्यामध्ये भरपूर छायाचित्रे, रेखांकित आकृत्या, परिशिष्टे, आकडेवारीचे रकाने, शेतकऱ्यांचे शंकासमाधान, पत्रव्यवहारातील पत्ते, ठिकाने, संबंधित व्यक्ती, संदर्भसाहित्य, प्रत्यक्ष भेटीतील अनुभव आदींची माहिती देखिल ह्या पुस्तकांमध्ये प्रकरणानुसार, नमूद केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक जरी शेतकरी बांधवांना सहज समजेल अशा मराठी मातृभाषेतून लिहिलेले असले, तरी देखिल कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचारी, तसेच कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना, संशोधकांना, कृषितज्ञांना आणि कृषि - सहकार व खाजगी स्वयंसेवी संस्थातील कृषि विस्तार कार्यकर्त्यांना सुध्दा हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
लेखक: शिवाजी ठोंबरे
संदर्भ क्रमांक: ४०७५
