काटकसर व बचत
सारांश: 'ओरिसन स्वेट मार्डेन' यांच्या एकॉनॉमी या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद. प्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल सतत जपेल त्याला आयुष्यात सुख-समाधान व शांतता लाभेल. आपल्या समाजात काटकसर करणाऱ्या माणसाची हेटाळणीच केली जाते. त्याला चिक्कू म्हणतात. पण ज्याला काटकसर करायची आहे त्याने या लोकनिंदेला तोंड दिलेच पाहिजे. कारण जर एखादे संकट आले तर त्यातला एकही तुमच्या मदतीला येत नाही. पण काटकसर आणि बचत करून एखाद्या माणसाला फार मोठा उद्योजक किंवा अब्जाधीश होता येणार नाही. कारण यशस्वी कारखानदार होण्यासाठी केवळ काटकसरीशिवाय इतर अनेक गुणांची जरूर असते. काटकसरीची सवय ही त्या गुणांपैकी एक आहे. परंतु सर्वसामान्य माणसाचे आयुष्य उत्तम जाण्यासाठी काटकसरीची सवय निश्चितच उपयोगी पडते. काटकसरी माणसाचे मन शांत राहते व ही फार मोठी देणगीच आहे. सामान्य माणसाला काटकसरीची जरुरी का आहे ? हे अनेक उदाहरणे देऊन या पुस्तकात सांगितले आहे. जो या पुस्तकातील सुचनांचा अभ्यास करून अंमलबजावणी करेल. त्याचा खूप फायदा होईल हे नक्की.
लेखक: ह. अ. भावे
संदर्भ क्रमांक: ५०९६
