रान भाज्या


सारांश: रानभाज्या' ही कल्पना सुचली तीच मुळी भारंगीची भाजी खात असताना. ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, त्या भागात साधारणपणे ही वनस्पती दिसते. परंतु मनात प्रश्न निर्माण झाला की ही भारंगी किती जणांना माहिती आहे ? एवढी रुचकर भाजी असूनही ती सर्वपरिचित नाही व अशा कितीतरी भाज्या आहेत, की त्या बहुतेकांना माहीत नाहीत. कितीतरी भाज्या सांगता येतील, की त्या प्रचलित नाहीत; परंतु खाण्यास योग्य आहेत. त्यांपैकी मला जेवढ्या माहीत झाल्या तेवढ्या मी घेतल्या. त्यातील योग्य माहिती वाचकांनी घ्यावी. उणिवा आहेतच. त्यांची दखल घेतली जाईल. परंतु याचे बी वगैरे लगेच कोठे उपलब्ध होऊ शकेल, असे वाटत नाही. सध्या कोहळा वगैरे मिळू शकतो. परंतु स्थानिक जंगलातून जाणकारांकडून माहिती करून घेऊन, खाद्य व अखाद्य भाजी कोणती यांची माहिती करून घ्यावी व मगच त्या वनस्पतींचा वापर करावा. पारंपरिक शेतीला पर्याय हवा, असे जो तो सध्या बोलतो आहे. तेव्हा सध्या बेचव, कीटकनाशकांनी युक्त अशा भाज्यांना काही पर्याय सापडू शकेल काय, हेही उत्तर शोधण्याचा यामागे प्रयत्न आहे. या वनस्पतींवर कोठे ना कोठे निरनिराळ्या दृष्टिकोणांतून संशोधन सुरूही आहे, तेव्हा भाजीसाठी या वानसांचा खास भाजीविषयक दृष्टिकोण समोर ठेवून संशोधन होऊन ते लोकाभिमुख व्हावे, हीच सदिच्छा आहे. एक नवीन दृष्टिकोण देत असताना जिज्ञासूंनी किती मिळणार यापेक्षा यातून आपल्याला काय करता येईल, असा अभ्यासू व संशोधनात्मक भाव ठेवावा, असे लेखकाला अभिप्रेत आहे.

लेखक: भा. पं. जोशी

संदर्भ क्रमांक: ४०७९

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र