अधिक माहिती
विनंती :
- कृपया वाचकांनी जबाबदारीची जाणीव ठेऊन पुस्तके सुस्थितीत राखण्यास सहकार्य करावे.
- कृपया पुस्तकांवर काहीही लिहू नये, कोणत्याही खुणा करू नयेत अथवा पाने दुमडू नयेत.
- कृपया वाचनासाठी पुस्तक घेणे अथवा ते पुस्तकालयात परत करतेवेळी लहान मुलांसोबत पालकांनी यावे.
- कृपया घेतलेले पुस्तक वेळेत परत करून दुसरे पुस्तक घेऊन जावे.
- कृपया या उपक्रमाचा लाभ सर्व गावकऱ्यांना व्हावा यासाठी पुस्तकालयाची आणि उपलब्ध पुस्तकांची माहिती गावात पसरवण्यासाठी सहकार्य करावे.
कार्यप्रणाली :
- पुस्तकालय उघडण्याची वेळ व तारीख सूचना फलकावर लिहिली जाईल.
- पुस्तके घेण्याची प्रक्रिया : इच्छुक वाचकांनी पुस्तकालयात येऊन अथवा पुस्तकालयाच्या संकेतस्थळावर वाचनासाठी पुस्तकाची निवड करावी. हवे असलेले पुस्तक उपलब्ध असल्यास नोंद करून पुस्तक घेऊन जावे.
- पुस्तके परत करण्याची प्रक्रिया : वाचकांनी पुस्तकालयात येऊन पुस्तक परत करावे आणि त्याची नोंद झाली असल्याची खात्री करावी.
नियमावली :
- पुस्तकांची देवाण-घेवाण कारण्यासाठी पुस्तकालयात नोंद करणे आवश्यक आहे, वाचकांनी परस्परांमध्ये पुस्तकांची देवाण-घेवाण करू नये.
- पुस्तक राखण्याचा अवधि : ७ दिवस अथवा पुस्तकालय उघडण्याच्या पुढील दिवसापर्यंत.
- एखादे पुस्तक वाचण्यासाठी अधिक कालावधी हवा असल्यास पुस्तकालयात येऊन विनंती करावी, अन्य कोणत्याही वाचकाने त्या पुस्तकाची मागणी न केल्यास पुस्तकालयात योग्य नोंद केल्यानंतरच पुस्तक अधिक कालावधीसाठी घेता येईल.
पुस्तकांच्या विभागांसंबंधी माहिती :
- विभाग १ : अध्यात्म, भारतीय संस्कृति यांविषयीची पुस्तके
- विभाग २ : इतिहास, महापुरुष यांविषयीची पुस्तके
- विभाग ३ : रोचक आणि बोधपर कथा, विनोद यांविषयीची पुस्तके
- विभाग ४ : विज्ञान, तंत्रज्ञान, निसर्ग, शेती, उद्योग यांविषयीची पुस्तके
- विभाग ५ : कलाकौशल्य, पर्यटन, समाजकारण आणि इतर विषयांची पुस्तके
- विभाग ६ : स्त्री विषयक पुस्तके