सार्थ संक्षिप्त श्रीदेवीपाठ
सारांश: मुलासाठी आई हीच सर्वांत जवळची असते व ती सहज प्रेमाने द्रवित होत असते. पुत्र हा जरी कुपुत्र झाला तरी माता ही कधी कुमाता होत नाही. सर्व संकटांचा नाश, सर्व विघ्नांपासून सुटका आणि सर्व इच्छांची पूर्तता, परम वैराग्य, तत्त्वज्ञानाचा उदय, भक्ति - प्रेमाच्या अमृत- प्रवाहामध्ये निमग्न होणे या सर्व गोष्टींची प्राप्ती मातेच्या आराधनेमुळे व उपासनेमुळे सहजपणे साध्य होते. या दृष्टीने मातेच्या आराधनेच्या काही स्तोत्रांचा संग्रह या पुस्तकामध्ये सादर केलेला आहे. देवीच्या उपासनेचे महत्त्व मेधा ऋषींनी सुरथ राजाला याप्रमाणे सांगितले आहे-
तामुपैहि महाराज शरणं परमेश्वरीम्।
आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा॥
"महाराज, त्या जगन्मातेला शरण जा. तिची आराधना केली असता तीच माणसांना इहलोकी सुख-समृद्धी, परलोकी स्वर्ग आणि मोक्षसुखही देते.” ऋषींचे हे वचन लक्षात घेऊन उपासकांनी भक्तिपूर्वक स्तोत्रपाठ केला असता भगवती त्यांच्यावर खात्रीने कृपा करील, यात संशय नाही.
लेखक: विनायक देसाई
संदर्भ क्रमांक: ११९९
