जिवाणू खते
सारांश: जीवाणूखत म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म व जिवंत सूक्ष्मजीवाणूंचे मिश्रण होय. ते बियांना लावल्याने, मातीत वापरल्याने किंवा सेंद्रिय पदार्थात टाकल्यामुळे ठराविक ठिकाणी नत्र स्थिर करणाऱ्या, स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जीवाणूंच्या संख्येत खूप वाढ होते. त्यांच्या उपयुक्त क्रियेने पिकांना अन्नद्रव्यें सुलभरितीने उपलब्ध होतात. थोडक्यात म्हणजे निसर्गांत उपलब्ध असणाऱ्या सेंद्रिय साधन संपत्तीचा, पीक वाढीसाठी जीवाणूद्वारे किंवा जीवाणू व पिकांच्या सहयोगामुळे उपयोग करून घेणे. म्हणूनच सर्वांगीण पीक उत्पादन वाढीमध्ये जीवाणूखते लक्षणीय योगदान देऊ शकतात. त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थासारख्या पुन्हा उपयोगात आणता येणाऱ्या नैसर्गिक साधनांचा जीवाणूखते ऊर्जा म्हणून उपयोग करतात. त्यामुळे मर्यादित असणाऱ्या व पुन्हा उपयोगात आणता न येणाऱ्या नैसर्गिक साधनांचा वाढता अपव्यय कमी होतो.
लेखक: पी. एल. पाटील, प्रा. प्रभाकर रसाळ
संदर्भ क्रमांक: ४०७२
