यशासाठी प्रशिक्षण
सारांश: ओरिसन स्वेट मार्डेन यांच्या 'दी यंग मॅन एंटरिंग बिझिनेस' या पुस्तकातील निवडक प्रकरणांचा भावानुवाद. या जगात यश, चिकाटी, संभाषणकला आणि कार्यनिष्ठा यामुळे मिळते. नशिबाने किंवा भाग्याने यश मिळाल्याची उदाहरणे फार दुर्मिळ आहेत. यश मिळवायला फार हुशारी लागत नाही. व्यवहारचातुर्य लागते. बुद्धिमत्ता ही जन्मजात असते. पण व्यवहार चातुर्य अभ्यासाने मिळते. म्हणजेच यशाचे प्रशिक्षण देता येते. व अशा तऱ्हेने यशासाठी प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. वेळेबाबत काटेकोर, स्वच्छ आर्थिक व्यवहार व कमीत कमी बोलणे हे यश देणारे गुण आहेत. तसेच शिस्तीचा गुणही संस्कारामुळेच मिळतो. या जगात आळशी माणसांना जागा नाही. सतत कार्यरत असणे हा फार मोठा गुण आहे. तुमचे कार्य हाच तुमचा अलंकार असतो. क आनंद घ्यायला शिकविता येते. त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीशी कसे लढायचे हेही शिकविता येते. यशाचे प्रशिक्षण देणारी शाळा कुठेही नाही. हे प्रशिक्षण तुमचे तुम्हीच घ्यायचे असते. हे प्रशिक्षण, या पुस्तकासारख्या आत्मविकास पुस्तकातून मिळवावे लागेल. यशाचे प्रशिक्षण घ्यायला भाराभर पुस्तकांची जरुरी नाही एखादे पुस्तकही पुरेसे होते यशाच्या प्रशिक्षणात एकाग्रतेचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. यशाचे खरे प्रशिक्षण प्रतिकूल परिस्थिती व संकटे यातूनच मिळते. सर्वस्व नष्ट होण्याच्या वेळीच पराक्रम जागा होतो, असा पराक्रम मन बळकट असेल तर संकट नसतानाही जागा होतो. यशाच्या प्रशिक्षणात कामाच्या योग्य पद्धतीलाही महत्त्व आहे. ज्याचा कारभार गबाळा आहे तो अयशस्वी होणारच. ज्या तरुणाकडे नवनिर्मितीची बुद्धी आहे व निर्णयशक्ती आहे तो यशस्वी होणारच. कारण निर्णय चुकला तरी तो दुरुस्त करता येतो. म्हणून उगीच सल्ला विचारत फिरु नका ज्या माणसाला भरपूर मित्र असतात त्यालाही यश मिळवायला मित्रांची मदत होते. तरीपण तुमच्या कर्तबगारीला मर्यादा असतेच ते ओळखा. यशाच्या प्रशिक्षणासाठी अनुकरण करायचे असेल तर थोर पुरुषांचे करा.
लेखक: ह. अ. भावे
संदर्भ क्रमांक: ५०९५
