उद्योगासाठी बांबू-शेती
सारांश: महाराष्ट्र हा शेती-सुधारणा व नवीन प्रयोग यामध्ये एक आघाडीचा प्रांत आहे. त्यामुळे दर्जेदार बांबू - निर्मिती आणि त्यावर आधारित उद्योग उभे करणं हे आपल्याला सहज शक्य आहे. बांबू निर्मितीत आपला आठवा-नववा क्रमांक लागतो, तेच जर दर्जेदार व शास्त्र शुद्ध लागवड केली तर आपण ४-५ व्या क्रमांकावर येऊ शकू. हा बांबू आपण कोळसा - निर्मिती, व्हिनेगार - निर्मिती, फर्निचर, उदबत्ती - काडी, उर्जा, हस्तकला, प्लाय बोर्ड आणि अनेक उद्योगात वापरू शकतो. उदबत्तीच्या काड्या आणि मसाला अगरबत्ती काड्या आणि तत्सम बांबू वस्तूंच्या आयात शुल्कामध्ये झालेल्या वाढीचा लाभ आपल्याला उठवता आला पाहिजे.
लेखक: डॉ. हेमंत बेडेकर
संदर्भ क्रमांक: ४०६७
