घराघरातील संस्कार कथा


सारांश: संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी 'रसात्मक वाङ्मय म्हणजे काव्य' अशी काव्याची व्याख्या केली असून काव्याची सहा प्रयोजने सांगितली आहेत. कीर्ती व द्रव्य यांची प्राप्ती, व्यवहारज्ञान, अमंगलाचा नाश, तत्काळ आनंदलाभ आणि कान्तेने केलेल्या उपदेशासारखा उपदेश या गोष्टी काव्याने साध्य होतात. संग्रहाच्या शीर्षकातूनच एक गोष्ट लक्षात येते की, या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत आणि जेव्हा आपण अंतरंगात प्रवेश करतो, तेव्हा कथेची काल्पनिकता कुठल्या कुठे विरून जाऊन 'हा आपण अनुभव घेतल्याचे' वाचकाला जाणवते. हा अनुभव आणून देण्याचे सामर्थ्य श्री. भागवतांच्या वर्णनशैलीत आहे. या कथांतील पात्रे त्यांच्या संवादातून सजीव होतात, तर परिसर तपशीलवार वर्णनामुळे सत्याभासाने शोभू लागतो. याहूनही या कथांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कथा वाचताना सहृदय वाचकाचे डोळे एकदा तरी पाणावल्यावाचून राहात नाहीत. भावपूर्णता आणि कौटुंबिकता यांनी नटलेल्या या कविता वाचकांचे चित्त खेचून घेतल्याखेरीज राहाणार नाहीत.

लेखक: दीपक भागवत

संदर्भ क्रमांक: ३१३७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र