नैसर्गिक शेती
सारांश: निसर्गशेती हा विषय म्हटला तर नवीन म्हटला तर जुना असा आहे. शंभरेक वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय शेती ही नैसर्गिक शेतीच होती. या पद्धतीत चालू शतकाच्या आरंभी बदल व्हायला लागला आणि शतकांच्या शेवटी तर आमूलाग्र बदल झालेला आहे हे आपण पाहातोच. नैसर्गिक शेती म्हणजे नवे सर्व सोडून परत जुने घ्यायचे असा अर्थ नाही. तथापि रासायनिक द्रव्यांचा अतिरेकी वापर टाळून पीक उत्पादन कसे घेता येईल, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आज खते आणि औषधे वापरल्याशिवाय पिके हाती येत नाहीत, मग हा वापर टाळून काय साधणार ही शंका येणे स्वाभाविकच आहे. शेती उत्पादन करायचे हे माणसांना चांगले अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठीच, अन्नधान्यांचा सकसपणा माणसांच्या आरोग्यास कारणीभूत असायला हवा आणि या हेतूने, अन्नधान्य पिकविले पाहिजे, हे शेती पिकविणारांच्या ध्यानात यावयास हवे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सद्य:स्थितीत उपलब्ध असलेले ज्ञान आणि साधने वापरूनही शेती फायद्याची नाही, त्यामुळे शेतीवरील लक्ष दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि हे असेच चालू राहिले तर आपल्यावर मोठे संकट येईल असे वाटते.
लेखक: भी. गो. भुजबळ
संदर्भ क्रमांक: ४०७०
