युगंधर


सारांश: गेली पाच हजार वर्षे भारतीय स्त्री-पुरुषांच्या व्यक्त-अव्यक्त मनांचा तळठाव व्यापून दशांगुळे शेष उरलेली एक सशक्त विभूतिरेखा एक युगपुरुष! श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात ते मुख्यत :श्रीमद्भागवत, महाभारत , हरिवंश व काही पुराणांत या प्रत्येकात गेल्या हजारो वर्षांत सापेक्ष विचारांची , मनगढंत पुटंच पुटं चढली. त्याचं तांबूस-नीलवर्णी, सावळ, गर्भातच दुर्लभ रंगसूत्रांचे संस्कार घेतलेलं, श्रीयुक्त म्हणजे सुंदर रुपडं घनदाट झालंय. तेही अतक्र्य चमत्कारांचे स्त्रोतच स्त्रोत -नकळत्या भाबडेपणी टाकल्यामुळ झालेलं आहे. आज तर श्रीकृष्ण क्रमश: वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर जाऊन बसलाय . आजच्या 'भारतीय 'म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा श्रीकृष्ण हा पहिला उद्गार आहे! जसा आभाळातील सूर्य कधी शिळा वा बासा होत नाही तसाच हा महाभारताचा कथाकणा असलेला तत्त्वज्ञ वीर, आज तर नाहीच शिळा होणार नाही जन्मत:च दुर्मिळ रंगसूत्र लाभलल्यामूळ त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या मूळ जीवनसंदर्भांची मोडतोड न करता त्याचं 'युगंधरी 'रूप बघता येईल का? त्याच्या स्वच्छ नीलवर्णी जीवनसरोवराचं दर्शन घेता येईल का? गीतेत त्यानं विविध जीवनयोग नुसतेच सांगितले का? कि हातच्या दिव्य, गतिमान सुदर्शनासारखे प्रत्यक्ष जगुनही दाखविले ? त्याच्या जीवनसरोवरातील हजारो वर्षे दाटलेलं शेवाळ तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारलं तर त्याचं 'युगंधरी' दर्शन शक्य आहे. 'मृत्युंजय' च्या यश:शील रचनाकाराची प्रदीर्घ चिंतन, सावध संदर्भशोधन, डोळस पर्यटन व जाणत्यांशी संभाषण यातून साकारलेली साहित्यकृती - युगंधर!!!

लेखक: शिवाजी सावंत

संदर्भ क्रमांक: ५०९४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र