श्री नारदपुराण


सारांश: अठरा पुराणांत भारतीय संस्कृती आणि धर्मतत्त्वांचे सामान्य जनांसाठी विध्दान महर्षीनी संकलन केले आहे.
नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे आसेतु- हिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराणे आहेत.
पुराणां सर्वशास्त्रावाणां प्रथमं ब्रह्माणा स्मृतम्।
उत्तमं सर्वलोकानां सर्व ज्ञानोपपादकम्॥
म्हणजे ब्रह्मदेवने समस्त शास्त्रांच्या प्रथम पुराणे अवलोकिली, कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होती. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केलेली असे म्हणतात. आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले.
नारदपुराणात भक्तीचे स्वरूप, योग, शैवागम, सामान्य धर्मपालन, खरे दान, गृहस्थ, धर्म, ज्योतिष आणि मंत्रविद्या अशा विविध विषयांचे प्राचीन कालचे ज्ञान कथन केलेले आहे. वर्तमान कालाला अनुरूप असे, या पुराणातील विषयांचे आम्ही संकलन केलेले आहे.

लेखक: दत्ता कुलकर्णी

संदर्भ क्रमांक: ११४८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र