ज्ञानेश्वरी निरुपण
सारांश: श्री संगोराम यांनी 'ज्ञानेश्वरी निरूपण' ग्रंथात ज्ञानेश्वरीचे सार सांगितले आहे. हे सांगताना त्यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष सारभुत, सांगणाऱ्या ओव्या दिल्या आहेत, तर काही वेळा महत्त्वपूर्ण अशा ओव्यांचा स्वतःच्या शब्दात भावानुवाद केला आहे. या दोन्हींची सांगड लेखकाने एवढ्या कुशलतेने केली आहे की, एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे अठरा अध्याय वहात राहतात व ग्रंथाच्या नौकेत बसून आपण त्यांचे अवगाहन करीत राहतो. ज्ञानेश्वरी समजायला अवघड आहे, हे खरेच आहे. पण लेखकाने किंवा निरूपणकाराने हा ग्रंथ सोपा केला, यात शंका नाही. मूळ अध्याय वाचण्यापूर्वी, या पुस्तकातील त्याचे निरूपण वाचावे आणि नंतर तो मूळ अध्याय वाचला, तर अध्याय समजणे सोपे जाईल.
लेखक: सेतुमाधव संगोराम
संदर्भ क्रमांक: ११६७
