तुकाराम महाराजांचे चरित्र


सारांश: तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व - पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे.
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव। 
तेथे नांदे देव पांडुरंग॥
इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिद्धेश्वराचे अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य होते, ते दैववान आहेत, वाचेने देवाचा नामघोष करीत आहेत. तुकाराम महाराजांच्या वेळचे हे देहू गावचे वर्णन आहे. तुकोबांपासून सुमारे दोनशे वर्षांपूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभरबाबा हे देहू गावी राहात होते. या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी-कार्तिकीची वारी विश्वंभरबाबांचे वाडवडिलांपासून चालत आली होती. पंढरीची वारी

लेखक: श्रीधरमहाराज मोरे

संदर्भ क्रमांक: ११७६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र