देवाचिये द्वारी


सारांश: आपण अनेक वेळा निरनिराळ्या देवतांच्या दर्शनाला जातो. मंदिरामध्ये गेल्यावर मूर्तीसमोर उभे राहून, हात जोडून नम्र भावनेने आपण नमस्कार करतो. परमेश्वराशी मनातल्या मनात संवादरुपाने बोलूनं आपले मन मोकळे करतो. मनातील दुःखे परमेश्वराला सांगून त्याच्या जवळ सुखाची याचना करतो. पुनः त्या मूर्तीचे डोळे भरून दर्शन करतो. अशावेळी त्या विशिष्ट देवतेपुढे म्हणण्याचा श्लोक किंवा मंत्र आपल्याला आठवत नाही. किंवा माहिती नसतात. देवापुढे असे श्लोक किंवा मंत्र का म्हणायचे? त्याची काय आवश्यकता आहे? परमेश्वर हा स्तुतिप्रिय आहे आणि स्तुती केल्याने तो प्रसन्न होतो. अशा श्लोकांमध्ये परमेश्वराची स्तुती केलेली असते, त्याचे गुणगान केलेले असते व त्याची लीला गाईलेली असते. अशा स्तुतीने प्रसन्न झालेला परमेश्वर आपले मनोरथ का पूर्ण करणार नाही? या पुस्तकात काही देवतांच्या स्तुतीचे किंवा प्रार्थनेचे मंत्र दिले आहेत. ते मंत्र किंवा श्लोक म्हणून आपण त्या देवतेची श्रद्धायुक्त अंत:करणाने प्रार्थना करू शकू. या पुस्तकाच्या शेवटी त्या देवतांच्या आरत्या दिल्या आहेत. पूजेच्या शेवटी आपण आरती म्हणतो. आरतीमध्येसुद्धा देवतांचे पराक्रम व लीला गायल्या असतात व आपल्याला सुखशांती समृद्धी देण्याची प्रार्थना केलेली असते. म्हणून पूजेच्या शेवटी आरती म्हणून प्रार्थना करायची असते.

लेखक: डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर

संदर्भ क्रमांक: ११३७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र