इंग्रजी - इंग्रजी - मराठी लघुकोश


सारांश: 'इंग्रजी' हा भाषाविषय शिकताना, विद्यार्थ्यांना 'स्पेलिंग' चा प्रश्न फार अवघड वाटतो. खूप वर्षांपूर्वी म्हणजे, १९५७ मध्ये, माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी शिक्षण या विषयावर एक कार्यशाळा - शिबिर दिल्लीला भरले होते. त्या कार्यशाळेमध्ये इंग्रजी शिकायला लागल्यापासून १ल्या २/३ वर्षात नेहेमी परिचयाचे होणारे, १५०० शब्द निवडण्यात आले. १ल्या दोन-तीन वर्षांत या १५०० शब्दांचे स्पेलिंग पाठ करण्याचा १ला टप्पा विद्यार्थ्यांनी गाठावा हे सर्व सोपे शब्द आहेत. पुढच्या दोन वर्षात स्पेलिंग पाठ करण्यासाठी आणखी १२०० शब्द निवडण्यात आले. हा झाला दुसरा टप्पा, त्यानंतरही ३ऱ्या व ४थ्या टप्प्यासाठी थोडे कठीण असे प्रत्येकी ३०० शब्दांचे २ टप्पे निवडण्यात आले. याप्रमाणे शालेय अभ्यासक्रमात ह्या ३३०० शब्दांचे स्पेलिंग पाठ झाल्यास विद्यार्थ्याला एकही स्पेलिंग अडणार नाही असे निष्कर्ष काढण्यात आले. या ठिकाणी कार्यशाळेतील शब्दांची फक्त यादी घेतली आहे; आणि, काही प्राध्यापक मित्रांच्या मदतीने त्यांचे उच्चार, व्याकरण, इंग्रजी व मराठी पर्याय यांची निवड करून हा लघुकोश तयार करण्यात आला आहे. रोज दहा शब्द पाठ केल्यास हा कोश वर्षाच्या आतच पाठ होईल. रोज ५ शब्द पाठ केले तर २ वर्षे लागतील इतकेच.

लेखक: ह. अ. भावे

संदर्भ क्रमांक: ५०८२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र