साररूप वाल्मिकी रामायण


सारांश: रामायण अनेक जणांनी सांगितले. ज्यांना जे भावले त्याला जास्त महत्त्व देऊन प्रत्येकाने रामायणाची गोष्ट सांगितली. या सर्व गर्दीमध्ये वाल्मिकीकृत रामायण थोडेसे हरवून गेल्यासारखे झाले. अनेक पात्रांच्या स्वरूपात आजच्या समाजाला उपयुक्त असे अनेक गुण रामकथेत बघायला मिळतात. असे गुण प्रकर्षाने पुढे यावेत, रामायण काळातील इतिहास पण पुढे यावा आणि तरीही रामकथा वाचायला सुबोध, सोपी व प्रवाही असावी आणि हे सर्व असून ती सामान्य वाचकाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावी, यासाठी हा लेखनाचा खटाटोप. मला शूर, उदात्त, प्रेमळ, गंभीर, मातृ व पितृभक्त, एकवचनी, एकपत्नीव्रती, दाता, शासक अशा श्रीरामरूपी उत्तम पुरुषामधला एक गुण प्रकर्षाने भावला. हा उत्तम पुरुष आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेच्या वेळी स्वार्थ बाजूला ठेवतो, प्रत्येक वेळी स्वतः कडे आणि स्वतःच्या माणसांकडे दुसऱ्यांच्या नजरेतून बघतो, विशेषत: टीकाकारांच्या नजरेतून बघतो आणि मग स्वतःचा न्याय स्वतःच करतो. तो प्रत्येक वेळी स्वार्थाविरुद्ध निर्णय घेतो, स्वतः शारीरिक वा मानसिक त्रास सहन करतो आणि आपल्या जवळच्या, प्रेमाच्या व नात्याच्या माणसांना पण तसेच करायला लावतो. 'कितीतरी स्वत: च्या माणसांवर वैयक्तिक अन्याय होतो आहे' हे माहीत असून देखील तो असे करतो. 'राम एवढे कठोर निर्णय का घेतो' याचा विचार केला तर एकच उत्तर मिळते. लोकनेता, राजा, शासक हा नेहमीच निष्कलंक हवा आणि तो तसा सर्व प्रजेला वाटायला हवा. ही गोष्ट जशी रामाच्या वेळेस खरी होती तशीच आजही खरी आहे आणि यापुढे सर्व वैयक्तिक त्रास गौण आहेत. आजच्या काळात विचारांची ही दिशा निदान दिसायला तरी हवी. आज आपण बघतो की ज्ञानी असणे, न्यायी असणे, लोकहितवादी असणे, निर्भय असणे, असे अनेक गूण आजच्या लोकनेत्यात पण कमी-अधिक प्रमाणात असतात पण स्वत:कडे व स्वत:च्या नातेवाईकांकडे टीकाकाराच्या नजरेतून बघू शकणे हा गूण क्वचितच आढळेल. शासक कसा हवा, तर ज्ञानी हवा, पराक्रमी हवा, सारासार विचार करणारा हवा, न्यायी, दानी व इंद्रियजित हवा, मनाने तापसी हवा आणि लोकहितवादी हवा.

लेखक: अरविंद दामले

संदर्भ क्रमांक: ३१२४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र