श्रीमल्लारिमाहात्म्य
सारांश: 'शिवाने मार्तंड भैरवाचे रुप घेऊन मल्ल नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणून त्याला मल्लारि म्हणतात. मल्लारि माहात्म्याची कथा संस्कृत ग्रंथात ह्याच नावाने प्रसिध्द आहे. हा ग्रंथ ब्रम्हांडपुराणाच्या क्षेत्रखंडात . आहे. या संस्कृत ग्रंथाचे २२ अध्याय असून त्यात ९३० श्लोक आहेत. खंडोबाच्या उपासकांनी आपल्या उपासना- क्षेत्रात त्याचा अत्यंत निष्ठेने स्वीकार केला आहे. अनेक ग्रंथकारांनी त्याची अवतरणे मराठीत आणली आहेत. श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी ते साररुपाने मराठीत आणले आहे. श्रीधरस्वामींचे निरुपण रसाळ व सरळ सोपे असल्याने ते लोकप्रिय आहे. श्रीधर स्वामींचे हे मल्लारि माहात्म्य दोन अध्यायांचे असून त्यात ३५५ ओव्या आहेत. मूळ संहितेशी अत्यंत प्रामाणिक राहून आपला भक्तिभाव प्रकट केल्याने तो हृदयाला भिडतो. त्यांचा प्रतिभाविष्कार पाहून आपण चकित होतो. मूळ कथेच्या एक तृतीयांश इतका संक्षेप करूनही मूळ कथेची आकर्षकता कमी झालेली नाही.
लेखक: श्रीधरस्वामी नाझरेकर
संदर्भ क्रमांक: ११८९
