श्री गणेश उपासना आणि संकष्टी चतुर्थी व्रतकथा


सारांश: श्री गणेश हे सर्व हिंदूंचे उपास्य दैवत आहे. परंतु इतिहासकालापासूनच महाराष्ट्रात श्रीगणेशउपासना खूपच लोकप्रिय झालेली आहे. गणेशोत्सव व संकष्टी चतुर्थीचे व्रत पेशव्यांच्या काळापासून महाराष्ट्रात फार पसरले. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले. तेव्हापासून तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात श्रीगणेशाची उपासना सुरू झाली. या पुस्तकाच्या पहिल्या भागात वर्षभर करायच्या संकष्टी चतुर्थीचा व्रतविधी दिला आहे. तसेच श्रीगणेशार्ची षोडषोपचारे पूजा कशी करावी याचे पूजाविधान दिले आहे. तसेच अथर्वशीर्ष व निरनिराळी गणपतीस्तोत्रेही दिली आहेत. महाराष्ट्रातील गणपतीची अष्टविनायक स्थाने प्रसिद्ध आहेत, त्यांचीही माहिती दिली आहे. तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी गणपतीस्तोत्र, संतानप्राप्तीसाठी गणपतीस्तोत्र, विघ्ननिवारणासाठी गणपतीस्तोत्र हेही दिले आहेत. अंगारकी चतुर्थीचे काय महत्त्व आहे हेही सांगितले आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात वर्षातील बारा संकष्टी चतुर्थ्यांच्या बारा कथा दिल्या आहेत. संकष्टी चतुर्थीचा उपास करणारे महाराष्ट्रात अक्षरश: लाखो लोक आहेत. त्या त्या संकष्टी चतुर्थीचे काय महत्त्व असते हे मात्र लोकांना माहीत नसते. यासाठी त्या त्या महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला उपास सोडण्यापूर्वी ज्या कथेचे पारायण करायचे आहे ती ती कथा दिली आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने केवळ उपास न करता त्या त्या चतुर्थीची कथा वाचावी म्हणजे जो हेतु मनात धरून संकष्टी चतुर्थीचा उपास धरला असेल तो हेतु साध्य होईल. म्हणून प्रत्येक गणेशभक्ताने या पुस्तकाचे वाचन व मनन केले पाहिजे. आपण श्रीगणेशाची भक्ती करतो, संकष्टी चतुर्थीचा उपासही करतो पण ही उपासना पद्धतशीर व्हावी, त्यात न्यून राहू नये म्हणून हे पुस्तक परिश्रमपूर्वक तयार केले आहे.

लेखक: रामसिंह पाटील

संदर्भ क्रमांक: ११८७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र