क्रीडा योग


सारांश: जीवनात येणाऱ्या अडचणींनी विचलित होऊ नये, हे प्रत्येकालाच ठाऊक असते. ते सांगण्यासाठी कुठल्या पुस्तकाची किंवा शिक्षकाची गरज नसते. पण प्रत्यक्षात एखाद्या अवघड प्रसंगाला तोंड द्यायची वेळ येते, तेव्हा आपले आत्मभान गळून पडते. महत्प्रयासाने मिळवलेली मन:शांती ढळून जाते. प्रक्षुब्ध झाल्याने आणि घाईने आपण किती पटकन आपल्या ध्येयापासून ढळतो, याची यथार्थ जाणीव आपल्याला होते. ही जाणीव निर्माण होण्यानेच अर्धी समस्या सुटते. खेळ आपल्याला आपल्या या भावस्थितीची पातळी दाखवून देतात, इतकेच नव्हे तर ती वाढवायला मदत करतात. ह्या खेळांमधले बहुतेक खेळ हे आपल्या देशाच्या विविध प्रांतात खेळले जातात. पिढ्यान्पिढ्या आपल्याकडे लोकप्रिय आहेत. किंबहुना ते तर आपले राष्ट्रीय खेळ आहेत. आपल्या देशाच्या समृद्ध वारशातील अनेक अंगांप्रमाणेच यातले बरेचसे खेळही नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. भारतीय परिस्थितीशी व सांस्कृतिक परंपरांशी फारशा अनुरूप नसणाऱ्या पाशात्य खेळांच्या आक्रमणामुळे हे घडत आहे. या परिस्थितीत आपल्याकडच्या काही स्वयंसेवी संघटना ह्या स्वदेशी खेळांचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात आहेत, ही नक्कीच स्पृहणीय बाब आहे. प्रस्तुत पुस्तक हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. पुस्तकात दिलेले खेळ शिकायला आणि खेळायला सहज सोपे असून त्यांच्यासाठी खेळपट्टी, गवत असलेले मैदान किंवा महागडी साधने यांची जरुरी नाही. सर्वजण हे खेळ खेळू शकतात. त्यात अगदी शंभर टक्के सहभागी होऊ शकतात.

प्रकाशक: विवेकानंद केंद्र

संदर्भ क्रमांक: ५०८३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र