सुलभ संपूर्ण रामायण
सारांश: रामायण व महाभारत हे दोन ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. महाभारत हे कौरवांच्या क्रौर्याचा, पांडवांच्या शौर्याचा, श्रीकृष्णाच्या कुशल राजनीती, मार्मिक निरीक्षण, दीन बंधुत्व, चातुर्य, शौर्य, अफाट बुद्धिमत्ता, अचूक निर्णय क्षमता, साहस इ. गोष्टींचा इतिहास आहे. तर रामायण ही रामाची गौरवगाथा आहे. रघुकुलाच्या पराक्रमाने तेजाळलेला तर रामाच्या सात्त्विकतेने उजळलेला इतिहास आहे. राम हा आदर्श पुत्र, आदर्श मित्र, आदर्श बंधू, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श राजा, पराक्रमी तरीही नम्र, त्यागी, विरागी, सत्त्वशील व्यक्तित्वाचा आदर्श, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी व्रताचे पालन करणारा, अनेक पतितांचा उद्धारक असं कितीतरी सांगता येईल. एका वाक्यात सांगायचं झालं तर श्रीराम म्हणजे सर्वच आदर्शाचा आदर्श आहे. त्यांच्या चरित्रातील काही गुणांचा अल्पसा अंश जरी आपण स्वीकारला, आचरला तरी आपल्या आयुष्याचे सोने होऊन जाईल.
प्रकाशक: सरस्वती बुक कंपनी
संदर्भ क्रमांक: ११५६
