संतांची अमृत वाणी भाग ३


सारांश: 'जगाच्या कल्याणा, संतांच्या विभुती' असे म्हणतातच. संतांची वचने म्हणजे अमृतवाणी, म्हणजे अमर असे 'ज्ञानामृतच' असते. संतांच्या नेत्रातून नेहमी प्रेमच पाझरत असते. संतांच्या डोक्यात विश्वकल्याणाचेच विचार असतात. समर्थ रामदास किशोरवयाचे होते; तेव्हा माळ्यावर अंधारात बसले होते. माता रेणुकेने त्यांना विचारले, “बाळा तेथे काय करतोस ?" किशोर रामदासांनी उत्तर दिले - "आई ! चिंता करितो विश्वाची" किशोर वयापासूनच संत, महात्मा होणाऱ्या माणसाच्या मनात सर्व जगाचे भले व्हावे हेच विचार असतात. ते पावन असतात आणि त्यांचे शब्दच अमृताचेच रूप धारण करून बाहेर येत असतात म्हणूनच संतांच्या या उपदेशपर बोधवचनाला 'अमृतवाणी' असे नाव दिले आहे. आपल्या बोलण्यातून शब्दातून अमृतवाणीचा वर्षाव करणारे एकाच देशात एकाच धर्मात एकवटलेले नाहीत. ते सर्व 'धर्मात' आहे व सर्व 'देशात' आहेत. जगात होऊन गेलेल्या व आज हयात असलेल्या अशा सर्व संतवाणीतून हे अडीच हजार सुविचारांचे व उपदेशांचे अनमोल मोती गोळा केले आहेत. संसारातील त्रिविध तापाने त्रस्त झालेल्या प्रापंचिकाला सुख मिळवून देण्यात संतांच्या या अमृतवाणीतील एक छोटेसे बोधवचनही पुरेसे आहे. फक्त त्या अमृतवाणीचा विचार प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणता आला पहिजे म्हणून संतांची ही अमृतवाणी एकदा वाचून भागणार नाही तर ती पुन्हा-पुन्हा वाचावी लागेल. आज जे जग अस्तित्वात आहे ते जग अनेक पिढ्यातील महान संतांच्या कार्यातूनच निर्माण झाले आहे. संतांच्या या सुवचनातून मानवजातीला अपार आनंदाची प्राप्ती झाली आहे.

लेखक: ह. अ. भावे

संदर्भ क्रमांक: ११७९

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र