श्री पद्मपुराण
सारांश: अठरा पुराणांत भारतीय संस्कृती आणि धर्मतत्त्वांचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षीनी संकलन केले आहे. नीती सदाचार आणि सत्चरित्र यांचे शिक्षण देणारे आसेतू हिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराणे होत.
पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम्।
उत्तमं सर्वलोकानां सर्वं ज्ञानोपपादकम्॥
म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांची प्रथम पुराणे अवलोकिली; कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. ह्या अठरा पुराणात श्री पद्मपुराणाचा उद्देश विष्णुभक्ती हा असला तरी यातील अनेक पौरणिक घटना व कथा आणि उपाख्याने ही जनजीवनासंबंधी असलेल्या विषयांना पोषक अशी आहेत. धर्म-कर्म व शरीर व मानसिक शुध्दतेसंबंधीची एक विशिष्ट दृष्टी या पुराणांच्या वाचनाने प्राप्त होते. श्री पद्मपुराण हे अशा शिक्षणाचे भांडार होय.
संपादक: दत्ता कुलकर्णी
संदर्भ क्रमांक: ११६८
