श्री अग्नीपुराण


सारांश: अठरा पुराणांत भारतीय संस्कृती आणि धर्मतत्त्वांचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षीनी संकलन केले आहे. नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे आसेतुहिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराणे होत.
पुराणां सर्वशास्त्राणा प्रथमं ब्रह्मणा स्मृतमं। 
उत्तम सर्वलोकानां सर्व ज्ञानोपपादकम्॥
म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या प्रथम पुराणे अवलोकिली. कारण जगांत सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात. आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. मूळ अग्निपुराणातील आशय व विषय कायम ठेवून त्याला योग्य असे वर्तमानकालीन रूप दिले आहे. श्री अग्निपुराणातील ज्ञान, म्हणजे भारतीय प्राचीन विद्यांचा हा विश्वकोश होय. यात धर्म, कर्म व मोक्ष या पुरुषार्थांचा जसा परामर्श घेतला आहे, तसाच या संदर्भातील अनेक कथांचाही तेथे आपणाला साक्षात्कार होतो. अग्नीने सांगितलेले पुराण म्हणूनच याला अग्निपुराण म्हणायचे.

लेखक: दत्ता कुलकर्णी

संदर्भ क्रमांक: ११३६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र