सोपी विज्ञान खेळणी
सारांश: सध्या सर्वत्र उपभोक्तावादी संस्कृती बोकाळली आहे. वस्तू खरेदी करा आणि फेका अशा प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचं फार मोठं नुकसान होत आहे. सध्या सर्वत्र कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. वस्तूच्या गुणवत्तेपेक्षा त्याच्या पॅकेजिंगलाच महत्त्व आहे. दुकानात मिळणारी प्रत्येक वस्तू दोन-तीन थरांमध्ये गुंडाळलेली असते. रोज अक्षरश: लाखो प्लास्टिकच्या बाटल्या, टेट्रापॅकचे खोके, पुट्ट्याचे डबे आण फोटोकॉपीचे कागद टाकले जातात. मुलं असा कचरा गोळा करू शकतील आणि त्यापासून मस्त खेळणी बनवू शकतील. अशी विनाखर्चाची खेळणी बनवत आनंदाने विज्ञानही शिकता येईल आणि त्याबरोबर पृथ्वी स्वच्छ करण्याचेही पुण्यकर्म होईल.
लेखक: अरविंद गुप्ता
संदर्भ क्रमांक: ४०६३
