प्रथमोपचार
सारांश: अपघात हा कसा व कुठे होईल हे कांही सांगता येत नाही. तुमची चूक असो वा नसो, दुसऱ्यांच्या चुकीपायी सुद्धा तुम्ही एखाद्या भयानक अशा अपघातामध्ये सांपडू शकता. अपघातानंतर लगेच केल्या जाणाऱ्या उपचारांना प्रथमोपचार म्हणजेच फर्स्ट- एड् असे म्हणतात. ह्या प्रथमोपचारापायी बरीच मदत होते. त्यामुळे अपघातामधुन बरे होण्याकरतां उपचार केले जातात. अर्थात हे सारे उपचार तात्पुरते असतात. झालेली जखम चिघळू नये, जास्ती रक्तस्त्राव होऊ नये, रोग्याला थोडा आराम वाटावा व हॉस्पिटलमध्ये रोग्याला त्रास न होता अगदी व्यवस्थित नेता यावे म्हणून हे उपचार करावयाचे असतात. त्यामुळे रोग्याचा जीव वाचवता येतो. त्यासाठी प्रथमोपचार कसा करावा ह्याचे सर्वसामान्यपणे प्रत्येक व्यक्तिला ज्ञान असले पाहिजे.
लेखक: डॉ. किशोरी पै
संदर्भ क्रमांक: ५०७६
