ताडोबाच्या जंगलात


सारांश: रात्रीचे साडेतीन वाजलेले. एरवी आपण गाढ झोपेत असण्याची ही वेळ. त्यातून फेब्रुवारी महिना. थंडी मस्त पडलेली. अशा वेळी थोडं जाड पांघरूण घेऊन आपण झोपेच्या स्वाधीनच झालेलो असतो. पण आम्हांला नागपूरवरून ताडोबाच्या जंगलापाशी सकाळी सहा वाजता पोचायचं होतं. ते अंतर होतं दोन- अडीच तासांचं. म्हणून मध्यरात्रीच उठलो. डोळ्यांवरच्या झोपेला कसंबसं दूर करत चहा घेतला आणि मग मात्र उत्साहानं भराभर सारं आवरून थंडीचे उबदार कपडे चढवून रात्री साडेतीन वाजताच निघालो. एरवी चंद्रपूरच्या बाजूनं एखाद्या दिवसाचा सोयीस्कर मुक्काम करून जंगलात दोन-तीन वेळा शिरण्याची आणि एखाद्या तरी फेरीत वाघ बघण्याची संधी घेतली असती. पण या वेळी हातात फक्त एकच दिवस होता. म्हणून अपरात्री उठून आम्ही जंगलाची वाट धरली. पहाटे दिशा अंधूकशा उजळत असताना...

लेखक: डॉ. अरुणा ढेरे

संदर्भ क्रमांक: ३०७३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र