महाभारतातील नीतिकथा


सारांश: महाभारत एक सागर आहे. त्यात समरप्रसंगांच्या उसळत्या लाटा आहेत. त्यात तेजस्वी नररत्ने आणि विचाररत्ने आहेत. त्यात जीवनाचे उलटसुलट वाहणारे प्रवाह आहेत. त्यात कथांचे चमकदार मोती आहेत. वरून दिसायला शिंपला अगदी साधा वाटतो. पण शिंपल्याच्या आत मौल्यवान मोती असतो. बोधकथेचे अथवा नीतिकथेचे तसेच आहे. वरवर पाहता ती पशुपक्ष्यांची गोष्ट वाटते. पण थोडीशी उकल केल्याबरोबर, उघडून आत पाहिल्यावर, तेथे रसरशीत मोत्यासारखी आकर्षक चिरंतन सत्ये आढळतात. ती जन्मभर उपयोगी पडतात. ती सत्ये माणसाला श्रीमंत बनवतात. ह्या संग्रहात महाभारतातील अशाच काही नीतिकथा सादर केल्या आहेत. अनेकांना वाटते की कथांचा हा प्रकार युरोपातून आपल्याकडे आला आहे. काही लोक इसापाला या तंत्राचा आद्य प्रणेता मानतात. पण ही कल्पना चुकीची आहे. आपल्या येथे अतिप्राचीन काळापासून बोधकथा प्रचलित आहेत. वेद आणि उपनिषदांतही या प्रकारच्या गोष्टी आढळतात. बुद्धाच्या जातककथा फार प्रसिद्ध आहेत. महाभारतातील ह्या गोष्टीही आपल्या प्राचीन कथावैभवाची साक्ष पटवतात. बालकांना ह्या कथा आवडोत, त्यांच्या हृदयी त्या ठसोत आणि त्यांच्या जीवनात त्या उपकारक ठरोत, हीच शुभेच्छा.

लेखक: प्र. ग. सहस्रबुद्धे

संदर्भ क्रमांक: ३०७०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र