स्वास्थ्यपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी तुळस
सारांश: भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक घरात तुळशीला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. हा अमृताचा अमूल्य ठेवा आपणास परंपरेने अनायासे मिळाला आहे. तुळशीमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मावरूनच आपल्यापूर्वजांनी आणि ऋषिमूनींनी तुळशीच्या झाडाला देवतासदृश पूजनीय मानले आहे. विष्णुप्रिया तुळशीचे अनन्यसाधारण माहात्म्य ओळखून एकदा प्रत्यक्ष भगवान शंकर नारदाला सांगतात,
पत्र, पुष्पं, फलं, मूलं
त्वक्, स्कन्ध संज्ञितम्॥
तुलसी सम्भवं सर्व
पावनं मृत्तिकादिकम्॥
(अर्थ: तुळशीचे पान, फूल, फळ, मूळ, साल, खोड आणि माती सर्वच पवित्र व सेवनीय आहे. ) तुळशीचे वैज्ञानिक महत्त्व : तुळशीचे झाड दिसायला लहान असले तरी तिच्या अंगी महान् गुणधर्म असल्यामुळे तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच तुळशी-विवाहासारखी व्रते आपल्या ऋषिमुनींनी सांगितली आहेत. मानवी जीवनाला तुळस ही अनेक दृष्टीने उपयुक्त असल्यामुळे मानवी जीवनात तुळशीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
लेखक: वैद्य गणेश जोशी
संदर्भ क्रमांक: ५०६४
.jpg)