रोगमुक्तीसाठी सचित्र आरोग्यासने


सारांश: रोजच्या धावपळीत होणारे श्रम म्हणजे 'व्यायाम' नव्हे. उलट त्या धावपळीने शरीर दमते. मनही थकते. म्हणूनच त्यांना (शरीर-मनाला ) कार्यक्षम व उत्साही राखण्यासाठी 'व्यायाम' घेणे अत्यावश्यक नव्हे काय ? योजनाबद्ध, प्रमाणबद्ध मुद्दाम केलेली शारीरिक हालचाल म्हणजे व्यायाम होय. त्याने शरीर लवचिक व तरतरीत बनून मनही उत्साही होते व रोगप्रतिकारक्षमता वाढून स्वास्थ्यरक्षण होते व निरामय दीर्घायुष्यही लाभते. आयुर्वेदात व्यायामाचे महत्त्व व फायदे पुढीलप्रमाणे वर्णिले आहेत. "लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्वेदसः क्षयः। विभक्तधनगात्रत्वं व्यायामादुपजायते॥" (वाग्भट). मात्र अति व्यायाम टाळणे आवश्यक आहे. अति व्यायामाची लक्षणे - दम लागणे, तोंड कोरडे पडणे, उघड्या तोंडाने श्वास घ्यावासा वाटणे, हुशारीऐवजी अशक्तता वाटणे, चांगल्या गोष्टीतही " अति तेथे माती" होऊ शकते. या दृष्टीने एका बिनखर्ची, सुटसुटीत, थोड्या वेळांत होऊ शकणाऱ्या व सोप्या अशा प्राचीन ऋषिप्रणीत व्यायामपद्धतीबद्दल माहिती दिल्यास जनता तिचे स्वागत करून प्रकृतिस्वाथ्याचा लाभ उचलील असे मानून हा प्रयत्न करीत आहे.

लेखक: डॉ. र. कृ. गर्दे

संदर्भ क्रमांक: ५०६३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र