शिवरायांच्या युद्धकथा
सारांश: बाल-कुमारांना कथा ऐकणे, वाचणे आवडते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यातून युद्धकथा म्हटल्या की त्या लहान थोर सर्वांनाच आवडतात. त्यांच्या या आवडीच्या माध्यमातून, महाराष्ट्राच्या लष्करी इतिहासातील मुकुटमणी ठरलेल्या आणि आपल्या अद्वितीय अशा युद्धतंत्राने निरनिराळ्या शत्रूंना गारद करून अक्षरशः शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती श्री शिवरायांच्या युद्धकथा त्यांच्यासमोर ठेवाव्यात आणि त्यांच्या काळातील या महान सेनानीच्या युद्धतंत्राची ओळख त्यांना करून द्यावी या उद्देशाने या कथा लिहिल्या आहेत. या कथांची भाषा बालकुमारांना आवडेल आणि त्यातील आशय त्यांना सहज समजेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कथांद्वारे श्री शिवछत्रपती हे एक सेनापती म्हणून कसे महान होते हे दाखवितानाच त्यांच्याविषयी असलेले काही परप्रांतीयांचे, काही परदेशातील इतिहासलेखकांनी मुद्दामच निर्माण केलेले गैरसमज कसे चुकीचे आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक: कॅ. राजा लिमये
संदर्भ क्रमांक: २०५६
