चिमुकली इसापनीती
सारांश: बाराखड्या येऊ लागल्यापासून जोडाक्षरे येऊ लागेपर्यंत मुलांचा बराच काळ जातो व साध्या अक्षरांची ओळख चांगली घटविण्यासाठी असा काळ जावा हे इष्टही आहे पण साधी अक्षरओळख चांगली घटविण्यासाठी मुलाला काही काळ तरी 'कुशा, काशी, गाय, पाटी' यासारख्या असंबद्ध सवंगड्यांशी बागडावे लागते; किंवा वारा आला पाऊस गेला' यासारख्या सृष्टीचमत्कारातल्या नीरस कार्यकारणसंबंधावर करमणूक करून घ्यावी लागते. एकंदरीनेच आमच्या हल्लीच्या शिक्षणक्रमात चटकदारपणा कमी. साधी अक्षरओळख पटवण्यासाठी वर सांगितलेल्या असंबद्ध शब्दसंघापेक्षा व बोजड सिद्धांतापेक्षा या पुस्तकाच्या वाचनाचा जास्त उपयोग होईल असे वाटते. मुलांना मनोरंजन पाहिजे. पुणे, न्यू इंग्लिश स्कूल सुरुवातीलाच विद्यावनातले अवपड- पणाचे कंटक स्तू लागले तर ती अगतिक होतील, निदान त्यांना विद्याप्राप्ती त्रासदायक तरी वाटेल. हे लक्षात घेऊन सदर गोष्टी अगदी साध्या भाषेत सोप्या शब्दांनी व एकही जोडाक्षर न येऊ देता सांगितल्या आहेत. चित्रेसुद्धा हवी होती पण ते पडले जरा खर्चाचे काम. सुदैवाने पुढे मागे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघण्याचा सुयोग आला तर पहाता येईल. जोडाक्षरे मुळीच येऊ द्यायची नाहीत असा संकल्प असल्यामुळे भाषा क्वचित बेडौल झाली आहे हे माझे मलाच दिसते आहे, पण त्याला उपाय नाही. केवळ दोषैकदृष्ट्या या भाषादूषणाबद्दल मजवर आक्षेप घेणाऱ्यांना आधीच उत्तर देऊन ठेवितो की, 'स्वतः लिहून पहा. '
लेखक: राम गणेश गडकरी
संदर्भ क्रमांक: ३०६५
.jpg)