झुंजार छत्रपती संभाजी


सारांश: छत्रपती श्री शिवरायांच्या मृत्यूंनतर स्वतः शहेनशहा औरंगजेब आपले सर्व सामर्थ्य एकवटून शिवरायांनी शून्यातून निर्माण केलेले स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी दक्षिणेत उतरला होता त्या महान शक्तिशाली शहेनशहाला श्री शिवरायांच्या या छाव्याने, अनेक आघाड्यांवर तोंड देतानाच स्वराज्याच्या पश्चिमेला सागरकिनारी जंजिऱ्याच्या किल्ल्यात लपून स्वराज्याला उंदराप्रमाणे कुरतडणाऱ्या सिद्दीला तसेच पोर्तुगीजांनाही झोडून काढून आपल्या पिताजींचे स्वराज्य जतन करून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काही भागांत या झुंजार छत्रपतीला माघार घ्यावी लागली पण स्वराज्याचा मोठा भाग त्याने शहेनशहाशी झुंज देऊन सुरक्षित ठेवला. तर गोव्याच्या पोर्तुगीजांना पार गोव्यात ढकलून संभाजी या नावाचीच त्यांना दहशत निर्माण होईल इतका मार त्यांना दिला. सुरुवातीला त्यांच्या विरोधात असणाऱ्यांनीच त्यांच्या स्वराज्याची गादी मिळविण्याच्या प्रयत्नात काटे पसरविण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या सर्व अडचणींवर मात करून हा झुंजार सेनानी छत्रपती झाला. त्याच्यात व्यक्तिगत असे काही दोष असतीलही पण त्याने शहेनशहाशी, पोर्तुगीजांशी, सिदद्यांशी दिलेला लढा लक्षात घेता त्याच्यातील दोषांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक वाटते. हा झुंजार छत्रपती एका बेसावध क्षणी पकडला गेल्यानंतर ज्या बाणेदारपणे मृत्यूला सामोरा गेला तो क्षण त्याच्या जीवनातील अग्निदिव्याचा क्षण होता आणि त्याच्या त्या मृत्यूने सारा महाराष्ट्र पेटून उठला आणि स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून दक्षिणेत उतरलेला शहेनशहा औरंगजेब, अखेरीस त्या ज्वालांमधेच होरपळून गेला. त्या झुंजार छत्रपतीच्या युद्धतंत्रावर नव्याने सामोरे आलेल्या माहितीच्या आधारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या छोट्याशा पुस्तकात केलेला आहे.

लेखक: कॅ. राजा लिमये

संदर्भ क्रमांक: २०५२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र