हिंदुत्व


सारांश: स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व जर देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वातंत्र्यानंतर रुजवले गेले असते तर आज देशाचे चित्र वेगळे असते. 
‘आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका। 
पितृभू: पुण्यभूश्र्चैव स वै हिंदुरिति स्मृत:॥’
या दोन ओळींमध्ये सावरकरांनी हिंदु कोणाला म्हणावे हे स्पष्ट केले आहे. या ओळीच्या संस्कृतमधील व्याख्येनुसार सिंधु नदीच्या स्रोतापासून सिंधुसागरापर्यंत असलेल्या भागाला भारत म्हणतात, हे भौगोलिक स्पष्टीकरण आहे. तर त्या भूमीमध्ये असणारे सर्व हिंदू आहेत का? तर नाहीत. तर मग ते हिंदू हे कोण ? तर ही भूमी जे 'पितृभू' म्हणजे त्यांच्या पूर्वजांची आहे असे जे मानतात, आणि ही भूमी जे 'पुण्यभू' म्हणजे त्यांच्या आचरणातील धर्माच्या स्थानाची आहे असे मानतात, अशा लोकांना हिंदु म्हणता येते, असे सावरकरांना म्हणावयाचे आहे. 

लेखक: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

संदर्भ क्रमांक: ५०५८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र