तेनालीरामाच्या चातुर्यकथा


सारांश: मुलांनो! माणसानं नुसतं हुशार, शहाणं, विद्वान किंवा पंडित असून भागत नाही; तर ह्याबरोबरच त्याच्या अंगी चातुर्य, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, विनोद वृत्ती अन् सावधानता ह्या गोष्टीही असाव्या लागतात. तसं असेल, तर अशी व्यक्ती नक्कीच राज अन् लोकमान्यतेला प्राप्त करून घेते. मागे वळून पाहिलं, काही जुना इतिहास, जुनं अक्षर वाङ्मय चाळलं, तर असं अलौकिक गुणवंत व्यक्तिमत्त्व लाभलेली दोन नावं मोठ्या दिमाखानं आपल्या पुढे येतात. आपल्याही दक्षिण भारतात अशी एक व्यक्ती होऊन गेली. त्याचं नाव तेनालीराम. तो विजयनगरचे महाराज कृष्णदेवराय ह्यांच्या दरबारातला एक थोर मानकरी. तेलगू देशात ह्या तेनालीरामाच्या चातुर्यकथा खूपच प्रसिद्ध आहेत. आपल्या इकडच्या मुलांनासुद्धा त्या कथा वाचायला नक्कीच आवडतील. कुणी असं म्हणतं की, तेनालीराम हा दरबारी केवळ 'खुषमस्कऱ्या ' होता. तो आपल्या विनोदी थट्टेखोर वृत्तीने अन् मस्करीने लोकांना, राजाला आणि दरबारी मंडळींना हसवीत असे. हे जरी खरं असलं, तरी पण... त्याला किती सावधगिरी घ्यावी लागत होती, त्याने हजरजबाबीपणा कसा दाखवला, राजकारणातल्या चुका, आज्ञेची अयोग्य अंमलबजावणी, त्यामुळं दुखावणारी प्रजा, निरपराध व्यक्तीला केलेला वाचवण्याचा प्रयत्न, ह्या अन् अशा अनेक गोष्टी सांगणाऱ्या ह्या काही प्रातिनिधिक कथा.

लेखक: अरुण गोखले

संदर्भ क्रमांक: ३०५९

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र