आचार्य गांगेय भीष्म
सारांश: आचार्य भीष्म ही महाभारतातील एक महनीय आणि वंदनीय व्यक्तिरेखा. चंद्रवंशातील राजा शंतनू आणि गंगा नदी यांचा हा पुत्र. देवव्रत. गंगा नदीने शंतनू राजाचा त्याग केला. त्यानंतर शंतनू राजा सत्यवती या मत्स्यकन्येवर मोहित झाला; त्याने तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला; पण भविष्यात देवव्रताऐवजी तिच्या मुलाला राज्य मिळावं, अशी तिची अट होती. पित्याच्या इच्छेसाठी त्याने प्रतिज्ञा केली, 'मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापूरच्या गादीवर कधीच बसणार नाही; पण सत्यवती मातेचा, तिच्या मुलांचा आणि हस्तिनापूरच्या गादीचा सांभाळ करीन.' त्याच्या या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीने शंतनू राजाशी विवाह केला. जीवनाच्या अखेरपर्यंत भीष्म प्रतिज्ञेपासून ढळले. नाहीत. भीष्मांचा पराक्रम, त्यांची उदारता, संयम, बुद्धिमत्ता, पांडवांबद्दलचं त्यांचं ममत्व या त्यांच्या गुणांचं आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचं संकलन करणारं हे चरित्र नक्कीच वाचनीय आहे.
लेखक: रा. वा. शेवडेगुरुजी
संदर्भ क्रमांक: २०५४
