वायू प्रदूषण
सारांश: पर्यावरणातील विविध अशा घटकात देवघेव आणि संतुलन प्रस्थापित झालेले असते. मानव आणि इतर प्राणीमात्र हवेतील ऑक्सिजन श्वासोच्छवासाद्वारे आत घेऊन कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडतात. या कार्बनडाय ऑक्साईडचे वनस्पती प्रकाशाच्या उपस्थितीत कार्बन आणि ऑक्सिजन अणूंमध्ये विच्छेदन करतात. प्राण्यांना जीवनासाठी हाच ऑक्सिजन उर्फ प्राणवायू हवा असतो. अशा परस्पर अवलंबनामुळे परिसरांची संरचना आणि विशुद्धता टिकून राहते आणि जीवनचक्र अव्याहतपणे चालू राहते. थोडक्यात सांगायचे तर सजीव व त्यांच्या भोवतालचा परिसर, त्यातील भौतिक व जैविक बदलामुळे सजीवांवर होणारा परिणाम किंवा त्याचा त्याला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेतील बदल या सर्वांनी मिळून पर्यावरण तयार होते.
लेखक: रमेश सहस्रबुद्धे
संदर्भ क्रमांक: ४०६०
