हितगुज लेकीशी वयात येताना


सारांश: प्रत्येक मुलीच्या आईला मुलगी ९-१० वर्षांची झाली की आपण तिला मासिक पाळी म्हणजे काय? ती का येते ? ती मुलींनाच का येते ? वगैरे गोष्टींची माहिती करुन द्यावी असे वाटत असते. पण ती नक्की कोणत्या शब्दात व केव्हा सांगितल्यावर मुलीला माहिती मिळेल पण मानसिक गोंधळ होणार नाही हे समजत नसते.... मुलगी वयात आली की आईला नेहमी काळजी वाटत असते. ती एकटी कुठे जाते? तिच्या मैत्रिणी कशा आहेत ? काय करतात? असे सतत आईच्या मनात येत असते. मुलींना वाटत असते, आई म्हणते, "मुलां-मुलींत फरक नसतो". तर मग आई आपलीच का काळजी करते. आपल्या भावाची का नाही करत? आईच्या आणि मुलींच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं हे पुस्तक आहे. अगदी मोजक्या शब्दांत, कुठलाही मुद्दा न गाळता सर्व माहिती व्यवस्थित दिली आहे. भाषा अत्यंत सोपी त्यामुळे माहिती लक्षातही छान राहते. या विषयावर पुस्तक लिहिण्याची कल्पना तर वाखाणण्यासारखी आहे.

लेखक: डॉ. अरुण गद्रे

संदर्भ क्रमांक: ६०१२

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र