विविध प्रांतीय मसाले


सारांश: अति प्राचीन काळी भारतात मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग औषधे, तेल, मलम तयार करण्यासाठी केला जात होता. इतकेच नाही तर, पूजेसाठी, मद्याला स्वाद आणण्यासाठी, अंघोळीचे पाणी सुगंधित करण्यासाठी, शरीरास लेपन करण्यासाठी, शिवाय धूप म्हणूनही मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जायचा. मात्र माणसाने मसाल्यांचा वापर खाद्यपदार्थात नेमका कधीपासून केला, याची ठोस माहिती उपलब्ध नाही. रामायणातदेखील मसाल्यांचा उल्लेख आढळतो. मूळत: मसाले हे वनस्पती उत्पादन या प्रकारात मोडतात. काही मसाले हे औषधी गुणांबरोबरच स्वयंपाकातील प्रमुख घटक मानले गेले आहेत. त्यांच्याशिवाय रोजचा स्वयंपाक होणे अशक्यच असते. केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात मसाला हा प्रकार खाण्याचे पदार्थ स्वादिष्ट बनवण्यासाठी उपयोगात आणला जातो. अर्थात प्रत्येक देशात त्या त्या वातावरणानुसार वेगवेगळे मसाले आणि त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. भारतातही प्रांतानुरूप मसाले आणि त्याचे स्वयंपाकातील स्थान वेगवेगळे आहे. सदर पुस्तकात अनेक प्रांतांतील गृहिणींशी बोलून विविध मसाल्यांच्या कृती संकलित केल्या आहेत. त्याचा सर्वच गृहिणींना निश्चित उपयोग होईल.

लेखक: मनोज आचार्य

संदर्भ क्रमांक: ५०३१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र