भारतीय थोरमाता
सारांश: आई किंवा माता हे एक माणसाचे प्रसिद्ध दैवत आहे. आई नेहमी क्षमाशील असते. मुलांचे अपराध ती मनावर घेत नाही आणि त्यांना चांगले वळण लावते. म्हणून कवीने म्हटले आहे की, “न ऋण जन्मदेचे फिटे” अशा काही भारतीय मातांच्या चरित्रकथा या पुस्तकात वाचावयास मिळतील. आपली पुराणे त्यांच्या कथा मोठ्या रसिकपणे आणि निष्ठेने सांगत असतात. महाभारत, रामायण या आपल्या राष्ट्रीय ग्रंथातून थोर मातांची चरित्रे आपणांस आढळतात. कुंती, गांधारी, जिजाबाई, इ. थोर मातांची चरित्रे आज विद्यार्थ्यांसमोर येणे आवश्यक आहे. यादृष्टीने काही थोर भारतीय मातांच्या चरित्रकथा या पुस्तकात वाचकांना आढळतील. थोर माता आपल्या अपत्यांना कसे मार्गदर्शन करतात हे यावरून समजून येईल.
लेखक: डॉ. प्र. न. जोशी
संदर्भ क्रमांक: २०४४
