आहार आणि जीवन
सारांश: खास गृहिणींसाठी पुस्तक आहे. आजच्या गृहिणीवर फार जबाबदारी आहे. एक म्हण आहे, 'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राते उद्धारी.' आता पाळणा लांबला. बंद करण्याची मोहीम सुरू झाली म्हणून आजच्या काळात योग्य म्हण म्हणजे, 'जिच्या हाती पोटाची शिदोरी, ती राष्ट्राचे आरोग्य सुधारी.' विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिकीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जीवनात स्पर्धा, वेग, निःसत्त्व आहार, ताण वाढत आहे. रोगाचे प्रमाण वाढत आहे. योग्य आहार आरोग्य वाढवितो तसेच रोग ताब्यात ठेवतो, बरा करतो. या पुस्तकातून आपल्याला आहारविषयक मार्गदर्शन निश्चितपणे मिळेल.
लेखक: डॉ. के. वि. पानसे
संदर्भ क्रमांक: ५०५१
