भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती


सारांश: 'भूगोल आणि नैसर्गिक आपत्ती' हा विषय म्हणजे दोन वेगवेगळे विषय एकत्र करून समाजाभिमुख अभ्यासक्रम बनविण्याच्या प्रयत्नाबाबत भूगोल अभ्यास मंडळाचे हार्दिक अभिनंदन! या अभ्यासक्रमावर आधारित या सर्व लेखकांनी तयार केलेले हे संदर्भ पुस्तक एक दिशादर्शक ठरणार आहे. जगात दिवसेंदिवस आपत्तींची संख्यादेखील वाढत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे. या आपत्ती कोणत्या, त्यांचे वर्गीकरण, कारणे, परिणाम आणि उपाययोजना यांचा योग्य असा मेळ या पुस्तकात मुद्देसूद दिलेला आहे. हे पुस्तक म्हणजे भूगोल व आपत्तींची जाणीव-जागृती करून देणारे असल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी, भूगोलप्रेमी, समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त आहे. आधुनिक युगात मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानात प्रगतीचा कळस गाठलेला आहे. आपले जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचा प्रयत्न मानव करत आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तींबरोबर मानवनिर्मित आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आपत्तींना सामोरे जाताना प्रत्येकाला या पुस्तकाचा उपयोग होईल.

लेखक: प्रा. ज्योतिराम मोरे , डॉ. प्रवीण सप्तर्षी

संदर्भ क्रमांक: ४०५४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र