आजीच्या विविध कोशिंबिरी


सारांश: आजकाल 'डॉक्टर, मी काय खाऊ?' अशी विवंचना अनेकांना असते. 'डाएट' सांभाळणं कितीजणांना जमतं, ही गोष्ट वेगळी; परंतु ते सांभाळावं असं अनेकांना वाटत असतं. लहानपणी वजन वाढू नये म्हणून; तर तरुणपणी कॉलेजात जायचं म्हणून किंवा लग्न व्हायचं आहे, बांधा सडपातळ असावा म्हणून, नंतर 'बाळंतपण मानवले' पूर्वस्थितीला यायला हवं म्हणून, चाळिशीत ब्लडप्रेशर वाढतंय म्हणून व शेवटी वय झालं म्हणून; एकंदर सतत डाएट हा विषय सुटत नाही व चवीपासून फारकत होते. परंतु खरे सांगायचे तर, आपले रोजचे साधे जेवण जेवा. भरपूर काम करा. प्रकृती ठणठणीत राहील. असे सांगून कुणाला पटणार आहे का? परंतु एक मात्र खरं की यावर पाश्चिमात्त्य पद्धतीची सॅलेड्स हाच उपाय आहे असं नव्हे. आपल्या पारंपरिक कोशिंबिरी तुमच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम करणार नाहीत. एक चमचा तेलाच्या फोडणीमुळे फारशा कॅलरीज वाढणार नाहीत; परंतु रुची मात्र खास येईल. तसंच पाच-सहा फुटी देहाला थोडं 'स्निग्ध वंगण' हवंच. या पुस्तकात पाश्चात्त्य पद्धतीच्या सॅलेड्सचा समावेश केलेला नाही. आपण आपलं पारंपरिक चांगले प्रकार सोडून फ्रेंच ड्रेसिंग, इटालियन ड्रेसिंग, मेयॉनीज सॉस, व्हेनिगर, कोल-स्टॉ इ. परकीय पदार्थांच्या आहारी गेलो आहोत. त्यात अशा सॅलेड्सची पुस्तकंही बाजारात उपलब्ध आहेत. तेव्हा आपल्या विविध प्रकारच्या जिन्नसांचा उपयोग करून करता येणारे कोशिंबिरींचे शंभराच्यावर प्रकार या पुस्तकात दिले आहेत. विविध भाज्या, फळभाज्या, डाळी, पालेभाज्या यांच्या अनेक प्रकारे करता येणाऱ्या कोशिंबिरी यात मी दिल्या आहेत. त्या प्रकृतीला तर उत्तम आहेतच; परंतु जेवणातील स्वाद व चव दोन्ही वाढविणाऱ्या आहेत. या पुस्तकातील एक कोशिंबीर रोज करून बघितल्यास जेवणातील विविधता वाढेल. त्यात आपणही मी सांगितलेल्या जिन्नसापेक्षा वेगळा जिन्नस वापरून या विविधतेत भर घालू शकता. वाटल्यास फोडणी देणे टाळू शकता; तसेच चवीनुसार मीठ व तिखट यांचं प्रमाण वापरू शकता.

लेखक: प्रमिला पटवर्धन

संदर्भ क्रमांक: ५०४६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र