रत्नजडित ज्ञानेश्वरी
सारांश: काही विशेष निमित्तांनी ज्ञानेश्वरीकडे आजपर्यंत भाविकांनी व अभ्यासकांनी विविध दृष्टींनी पाहिले आहे. पण ज्ञानेश्वरी ही रत्नजडित आहे, याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. ज्ञानेश्वरीची प्रत सर्व अंगांनी नटवून, तीवर जडावाचे दागिने घालून, ती रेशमाने सजवून खचितच संपन्न होणार नाही. वरवरचे कितीही अलंकार घातले, तरी ज्ञानेश्वरीचे सौंदर्य आणखी खुलेल असे नाही. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगावयाचे झाले तर लेण्यांमुळे शरीरास शोभा येते, हे खरे असले तरी एखाद्या प्रसंगी अंगच्या गुणांमुळेही अलंकारांना शोभा प्राप्त होते. ज्ञानेश्वरी मूळचीच सतेज, टवटवीत, लखलखीत आणि नित्य नूतन आहे. ती स्वयंप्रकाशी असल्याने तिला वरवरचे दागिने शोभा देणार नाहीत, हे अलंकारच मनातून लज्जित होतील. एवढी ज्ञानेश्वरी स्वत:च लावण्यमयी व यौवनसंपन्न आहे.
लेखक: डॉ. प्र. न. जोशी
संदर्भ क्रमांक: ११०९
