नैसर्गिक सौंदर्यसाधना
सारांश: आजकाल रसायनयुक्त सौंदर्य-प्रसाधनांचे पेव फुटले असून त्यांचा उपयोगापेक्षा उपद्रव जास्त होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कित्येक लोक आता त्यांचा नाद सोडून साहाय्यक साधने आणि नैसर्गिक व वनस्पतिजन्य पदार्थ यांचा आहारात उपयोग करू लागले आहेत. अशा प्रकारे नैसर्गिक सौंदर्यवर्धनावर भर देणाऱ्या लोकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, तसेच मार्गदर्शनही करील. नैसर्गिक सौंदर्य हा फार दुर्मिळ विशेष आहे. ते अंतरीच्या आरोग्याचे प्रतिबिंब असते आणि ते कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांनी मिळू शकत नाही. शरीर आणि मन निरोगी नसेल तर त्वचा आणि केस निर्जीव दिसतात. तसेच तुम्ही शरीराची स्वच्छता काटेकोरपणे ठेवली नाही तर कितीही चांगली आणि महागडी क्रीम्स आणि लोशन्स लावली तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही. निरोगी शरीर आणि प्रसन्न मन याच दोन मूलभूत गोष्टी खऱ्या सौंदर्यासाठी आवश्यक असतात. नितळ त्वचा, चमकदार डोळे, तसेच केस, लखलखीत दात आणि आकर्षक अवयव यांमुळेच नैसर्गिक सौंदर्यात भर पडते. शरीराची ठेवण आपण बदलू शकत नाही, परंतु नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी काही मूलभूत गोष्टी मात्र आपण नक्कीच करू शकतो. सुंदर दिसण्यासाठी काही जण महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतात, तर काही जण सौंदर्यप्रसाधनालयात जाऊन अनेक खर्चिक उपाय करून घेतात. यामुळे काही दोष वा व्यंगे लपवता येतील, परंतु त्यामुळे नैसर्गिक सौंदर्याचा लाभ मात्र मिळू शकणार नाही.
लेखक: डॉ. हरी कृष्ण बाखरू, डॉ. अरुण मांडे
संदर्भ क्रमांक: ६०१३
