स्ट्रॉबेरी लागवड
सारांश: स्ट्रॉबेरीला समशीतोष्ण हवामान चांगले मानवते. फुले येण्यासाठी आठ तासांपेक्षा कमी असलेला दहा दिवसांचा सूर्यप्रकाश पुरेसा असतो. हिवाळ्यात झाडांची वाढ कमी प्रमाणात होते व जसजसा दिवस मोठा होत जातो व उष्णतामान वाढत जाते तसतसे झाड वाढू लागते. त्याचवेळी झाडांना बहर येऊ लागतो. हवामान व जमिनीचा प्रकार ही दोनच कारणे स्ट्रॉबेरी वर्गीय फळझाडांची लागवड ठराविक भागात होण्यास जबाबदार आहेत. या फळझाडांना उत्तम निचरा असलेली मध्यम प्रतीची परंतु सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन लागते. किंचित आम्लता असलेली (५.७ ते ६.५ सामू) जमीन अधिक चांगली होय. त्यापेक्षा अधिक आम्लता असलेल्या जमिनीत झाडांची फळे चांगली जोपासली जात नाहीत. महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरीवर्गीय फळझाडांची लागवड वाढावी, शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान मिळावे आणि अनावश्यक खर्च कमी व्हावा, तसेच पीक उत्पादनातील किफायतशीरपणा वाढविण्यास मदत व्हावी या हेतूने पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हवामानाचा पिकावर होणारा परिणाम, जमीन, संजीवकांचा वापर, जाती, कीड व रोग या बाबत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे. स्ट्रॉबेरी लागवड हे पुस्तक लिहिताना डॉ. एम्. टी. पाटील यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पुस्तकासाठीची रंगीत छायाचित्रे महाबळेश्वरच्या डॉ. रेड्डी पतिपत्नींच्या स्ट्रॉबेरी शेतातील आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानणे उचित होय. महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठी वाचता येते अशा शेतकरी बंधूंना समजेल अशी भाषा वापरून संशोधनाच्या निष्कर्षाचा उल्लेख सोप्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक: विकास खैरे
संदर्भ क्रमांक: ४०५३
