गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाककृती


सारांश: गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे. प्रमुख वैशिष्ट्यं : १) पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ २) पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता ३) अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण ४) प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत ५) पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स ६) बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग

लेखक: डॉ. जी. पद्मा विजय, डॉ. अरुण मांडे

संदर्भ क्रमांक: ६००५

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र