आपली मंगळागौर
सारांश: पावसाच्या रिमझिम सरी, हिरवागार निसर्ग, विविध सण, या सर्वामुळे श्रावणातील वातावरण प्रसन्नता व मांगल्य यांनी भारलेले असते. या अशा दुर्मिळ वातावरणाला जोश आणि ठासून भरलेल्या उत्साहाची जोड मिळते ती, मंगळागौरीच्या खेळांमुळे! मंगळागौरीच्या खेळांमध्ये सहभाग असतो तो अगदी तरुणींपासून ते साठी उलटलेल्या स्त्रियांचा, आणि तोही सारख्याच उत्साहात! मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच होय. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठ्या कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ, असंख्य पारंपारिक गाणी, उखाणे... अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- 'आपली मंगळागौर'या पुस्तकाच्या स्वरुपात!
लेखक: वैजयंती केळकर
संदर्भ क्रमांक: ६००२
