सुलभ आयुर्वेदीय हितोपदेश


सारांश: संस्कृत भाषा व आयुर्वेद हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यांचा एकत्र विचार करणे अत्यंत हितावह आहे. प्रत्यक्षात आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याना प्रारंभिक स्तरावर संस्कृत शिकवताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. अभ्यासासाठी समोर येणारे विद्यार्थी हे विशेषत: इंग्रजी माध्यामातून आलेले असतात. सायन्स विभागात प्राविण्य मिळवणारे तसेच संस्कृत विषया विषयी पूर्णपणे अज्ञानी असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन पुस्तकात बदल केले आहेत. या पुस्तकाची मांडणी करताना शब्दार्थ, समास, संधी तसेच विषयाचा एकसंधपणा या सर्व गोष्टींचा विचार केल्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास मला वाटतो. गुण मिळवणे हे परीक्षार्थीचे ध्येय निश्चित असले पाहिजे, त्या बरोबरच, भाषेचे आकलन, अयुर्वेदिक परीभाषेचे ज्ञान, पुढे जाऊन अभ्यास करावयाचे आयुर्वेदाचे विषय संस्कृत भाषेमधुन आहेत या संबंधी जाणीव या पुस्तकातून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक ठिकाणी श्लोक, शब्दार्थ, अन्वय, अनुवाद ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्या ठिकाणी टीपा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संस्कृत- आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून कसे प्रश्न विचारले जातील या संबधीची उदाहरणे दिली आहेत.

लेखक: डॉ. विनायक गरुड 

संदर्भ क्रमांक: ५००९

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र